SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

schedule09 Apr 26 person by visibility 269 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज गुरुवारी के.एस.बी.पी. पार्क परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

 

या कारवाई वेळी 2 लो़खडी अँगल, 1 टेबल,  2 हातगाडी, 4 काँउन्टर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी 19 हातगाडया मालकांनी स्वता:हून काढून घेतल्या.

 

सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर ट्रॉली व 1 डंपरचा वापर करण्यात आला.

ही कारवाई महापौर रुपाराणी निकम यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्रमांक.03 कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली. 

तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने येथून पुढेही शहरामध्ये अनाधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या अनाधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधीत दुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id