SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिनासाठी तक्रारी दाखल करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी

schedule17 Apr 26 person by visibility 196 categoryराज्य

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालय, जिल्हाधिकारी व महानगरपालिका स्तरावर, दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त स्तरावर आणि तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर ‘लोकशाही दिन’ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील काही नागरिक महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित तक्रारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दाखल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. महानगरपालिका स्तरावरील तक्रारी या संबंधित महानगरपालिका कार्यालयाकडेच दाखल करणे आवश्यक आहे.

परिपत्रकानुसार, महानगरपालिकेशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिनाचे अध्यक्ष हे संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त असतात. त्यामुळे कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्राशी संबंधित तक्रारी त्या त्या महानगरपालिका कार्यालयातच सादर कराव्यात.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्र वगळता इतर भागाशी संबंधित तक्रारीच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये दाखल कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id