SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

पन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभ

schedule28 Oct 26 person by visibility 218 categoryराज्य

कोल्हापूर : महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तहसिल कार्यालय पन्हाळा येथे नुकतेच महसूल लोक अदालतीचे आयोजन पार पडले . या लोक अदालतीसाठी एकूण ४५ प्रकरणांमध्ये संबंधितांना उपस्थित राहण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३२ प्रकरणांमध्ये पक्षकार उपस्थित होते. यातील ३० प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी समक्ष परस्पर संमतीने तडजोड सादर केली. या महसूल लोक अदालतीमध्ये एकूण १४२ खातेदारांना लाभ दिल्या असल्याची माहिती तहसिलदार माधवी शिंदे यांनी दिली.

महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार महसूल विषयक प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यासाठी या अभियानांतर्गत लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे .

 नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id