SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

कुक्कुट पालन प्रशिक्षणार्थींनी संपर्क साधण्याचे आवाहन

schedule17 Apr 26 person by visibility 215 categoryराज्य

कोल्हापूर : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापूर येथील कुक्कुट प्रक्षेत्रावर प्रशिक्षणार्थींसाठी वर्षभर कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्कीट हाऊस जवळ, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. एस.एम. राऊत यांनी केले आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी-5 दिवस, ऑनलाईन/ ऑफलाईन, प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 200, प्रशिक्षणाचा कालावधी-15 दिवस, ऑनलाईन/ ऑफलाईन, प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 500, प्रशिक्षणाचा कालावधी- 30 दिवस, ऑफलाईन, प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 2 हजार, प्रशिक्षणाचा कालावधी-  6 महिने, ऑफलाईन, प्रति प्रशिक्षणार्थी आकारावयाचे सेवाशुल्क- 4 हजार रुपये आहे.

प्रशिक्षणासाठी आधार कार्ड, शिक्षण दाखला (10 वी 12 वी मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला), दोन फोटो व जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत. प्रशिक्षणामध्ये देशी, मांसल पक्षी व अंड्यावरील पक्ष्यांच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात येते. अधिक माहितीसाठी 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id