SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

‘केआयटी’त सायबर सुरक्षा विषयात विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे धडे

schedule27 Oct 26 person by visibility 250 categoryशैक्षणिक

सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद

कोल्हापूर : राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिन्याचे औचित्य साधून केआयटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (प्रदत्त स्वायत्त) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर सुरक्षा विषयावर एका विशेष जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या पुढाकाराने १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान देशपातळीवर राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट सवयी रुजवणे हा होता. या सत्रात कोल्हापूर सायबर क्राईम शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय हारुगडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गुन्ह्यांच्या तपासातील उदाहरणांसह डिजिटल सुरक्षेचे महत्त्वपूर्ण धडे दिले.

मार्गदर्शनादरम्यान पीएसआय संजय हारुगडे यांनी फिशिंग लिंक्स, बनावट बँकिंग संदेश आणि संशयास्पद गुंतवणूक योजना कशा ओळखाव्यात, तसेच बँक खात्याची माहिती किंवा ओटीपी चोरीला गेल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत, याची सविस्तर माहिती दिली. सोशल मीडिया सुरक्षा, प्रायव्हसी सेटिंग्जचे व्यवस्थापन, अनधिकृत स्रोतांवरून थर्ड-पार्टी एपीके फाइल्स डाउनलोड करण्याचे धोके आणि सुरक्षिततेसाठी बहुस्तरीय प्रमाणीकरण प्रणालीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. सायबर फसवणूक झाल्यानंतरचे पहिले काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात असे सांगत, आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी अजिबात न घाबरता राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टल वर तक्रार नोंदवावी किंवा राष्ट्रीय सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

या सत्रासाठी संस्थेचे चेअरमन  साजिद हुदली, व्हाईस चेअरमन  सचिन मेनन आणि सेक्रेटरी  दीपक चौगुले यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले, तर केआयटीचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

 याप्रसंगी अधिष्ठाता,विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.निवास पाटील व प्रा.वसुंधरा महाजनी यांच्यासह रा.से.यो.चे सर्व स्वयंसेवक आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id