SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

मिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास

schedule30 Mar 26 person by visibility 289 categoryक्रीडा

▪️केंद्रासाठी खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन

  कोल्हापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मिशन लक्षवेध योजनेंतर्गत जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभावान खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

  राज्य शासनाचा उद्देश ऑलिम्पिक स्तरावरील १२ क्रीडा प्रकारांमध्ये गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविणे हा असून या योजनेतून क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, पायाभूत सुविधा, स्पर्धा आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करिअर मार्गदर्शन खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी विदेशी संस्थाच्या सहयोग हे सर्व घटकांचा विकसित करणे आहे. ही योजना त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

  कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती, मैदानी खेळ, वेटलिफ्टिंग, हॉकी आणि रायफल शूटिंग या पाच क्रीडा प्रकारांमध्ये प्रत्येकी २० खेळाडूंची निवड केली जाणार आहे. जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राच्या माध्यमातुन कुस्ती, मैदानी, वेटलिफ्टींग, हॉकी व रायफल शुटिंग या खेळाकरीता निवड चाचणीचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. राज्यातील पात्र व गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना संबंधित खेळामध्ये प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत आहेत.

  खेळाडूचे वय ३१ डिसेंबरपर्यंत २१ वर्षांखालील असावे. अर्जासोबत जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील २ वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, पासपोर्ट साईज 3 फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धेतील किमान कामगिरी राज्य स्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू, ( शालेय /संघटना अधिकृत स्पर्धा ) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक राहील.

  वरील निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची निवड तज्ञ समितीव्दारे करण्यात येणार असून ही प्रक्रीया अनिवासी राहिल. त्यांचा पुरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व विदेशी स्पर्धा प्रवास खर्च, प्रशिक्षक / मार्गदर्शक, वैद्यकीय उपचार, विमा आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च योजनेंतर्गत केला जाणार आहे. निवड चाचणी आयोजन समिती प्रमुख अजिंक्य चौगले, सहाय्यक क्रीडा विकास अधिकारी, मो. ९१५८५८७७७२ हे राहतील.

  मिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा प्रतिभा विकास  केंद्राकरिता जिल्हास्तर निवड चाचणी खेळ निहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
  हॉकी- 7  एप्रिल रोजी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, कोल्हापूर, सबंधित अधिकारी-  रविभूषण कुमठेकर
 (राज्य क्रीडा मार्गदर्शक)  ८३७९०१३८४७

  रायफल शुटींग- 7  एप्रिल रोजी छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर, कोल्हापूर, सबंधित अधिकारी- अनिकेत बोडके (राज्य क्रीडा मार्गदर्शक) 7499629679

  वेटलिफ्टींग- 8 एप्रिल रोजी हार्क्यूलस वेजिम, कुरुंदवाड, सबंधित अधिकारी- अजिंक्य चौगले (स.वि.क्री.अ) ९१५८५८७७७२

  कुस्ती- 9 एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सबंधित अधिकारी- श्री.अजिंक्य चौगले (स.वि.क्री.अ)९१५८५८७७७२

  मैदानी- 9 एप्रिल रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सबंधित अधिकारी- सीमा पाटील (राज्य क्रीडा मार्गदर्शक) ९४०३१२३७४३

  निवड चाचणीकरीता जिल्ह्यातील कुस्ती, मैदानी, वेटलिफ्टींग, हॉकी व रायफल शुटिंग या खेळाच्या खेळाडूंनी वर दिल्याप्रमाणे कागपत्रांची पुर्तता  missionlakshvedhdsokop@gmail.com या मेल आयडीवर किंवा प्रत्यक्षात आपले अर्ज  ५ एप्रिल पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. जिल्हास्तर निवड चाचणी करीता जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id