SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

राधानगरीत रानगव्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

schedule11 Apr 26 person by visibility 257 categoryगुन्हे

कोल्हापूर  : राधानगरी तालुक्यातील पालखुर्द्द येथे रानगव्याच्या हल्ल्यात ८० वर्षीय शामराव कोडिंबा कोराणे या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

 आपल्या घराचे बांधकाम सुरू असल्याने शामराव घरामागील झाडाखाली बसले होते, तेव्हा जंगलातून आलेल्या रानगव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. गव्याने छातीत शिंगे खुपसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 वन्यविभागाने हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मृत शामराव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id