SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यात ‘व्हिजन फॉर ऑल’ उपक्रमाची सुरुवात ५,२८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप

schedule17 Mar 26 person by visibility 354 categoryआरोग्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असूनही आर्थिक अडचणीमुळे चष्मा घेणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून आणि रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने ‘व्हिजन फॉर ऑल’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत आर.बी.एस.के. कार्यक्रमातून शासकीय व निमशासकीय शाळांमधील गरजू मुला-मुलींना मोफत चष्मे देण्यात येत आहेत.

या उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ५ हजार २८० विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले आहेत. तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे – आजरा १९९, भुदरगड १७४, चंदगड २८, गडहिंग्लज २१२, गगनबावडा १८, हातकणंगले ६८४, कागल १८७, करवीर ४०५, पन्हाळा ४६३, राधानगरी ६३२, शाहूवाडी २३१, शिरोळ ८४०, कोल्हापूर महानगरपालिका ५१९ व नगरपालिका क्षेत्रात ६८८ विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने उपस्थित होते. 

दि. १४ मार्च रोजी हॉटेल वृषाली येथे झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये  मुक्ती राजू भस्मे (इंदुमती गर्ल्स हायस्कूल),  संध्या शिवाजी गवळी (जरगनगर विद्यालय),  माहिन जमीर शिकलगार (जरगनगर विद्यालय), इमामहुसेन मलिक पठाण (टेंबलाईवाडी विद्यालय), माधव कैलास सूर्यवंशी (वीर ककया विद्यालय), मेघराज कुमार कांबळे (गोविंद पानसरे विद्यामंदिर) आणि जय धोडीराम शिंदे (कोटितीर्थ विद्यालय) या विद्यार्थ्यांना चष्मे देण्यात आले.

या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी मदत होणार असून त्यांच्या दृष्टी आरोग्यातही सुधारणा होण्यास हातभार लागणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id