SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीत‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटन

schedule27 Oct 26 person by visibility 394 categoryशैक्षणिक

वारणानगर : तात्यासाहेब  कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (टीकेआयईटी), वारणानगरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातर्फे आणि वारणा विद्यापीठाच्या सहकार्याने ‘फ्युचर रेडी इंजिनिअर्स प्रोग्राम २०२६–२७’चे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील बदलते प्रवाह, कौशल्ये आणि अपेक्षांची माहिती देणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाला पुणे येथील आय एफ बी रेफ्रिजरेशन लि.चे उद्योगतज्ज्ञ उपस्थित होते. कंपनीचे कार्यकारी संचालक  व्यंकट मदाला यांनी ‘भारतीय गृहउपकरण उद्योग : उत्क्रांती, परिवर्तन आणि भविष्यातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी उद्योगातील बदल, तंत्रज्ञानाची प्रगती आणि भविष्यातील संधी स्पष्ट केल्या.

कंपनीचे उपाध्यक्ष  काशीराम मेस्त्री यांनी ‘अभियांत्रिकी पदवीधर ते उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक : कौशल्ये, मानसिकता आणि अपेक्षा’ या विषयावर संवाद साधला. तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये, सकारात्मक मानसिकता, कार्यसंस्कृती आणि उद्योगांच्या अपेक्षांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

या सत्रांमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी आणि आवश्यक कौशल्यांची माहिती मिळाली. शैक्षणिक ज्ञान व औद्योगिक गरजा यांतील अंतर कमी करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.

उपक्रमासाठी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांचे मार्गदर्शन लाभले.

आयोजनासाठी, प्राचार्य, डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, विभागप्रमुख, डॉ. पी. व्ही. मुळीक, प्रा. जी. एस. कांबळे, डॉ. एस. व्ही. लिंगराजू,  प्रा. एस.एच. पाटील, डॉ. ए. व्ही. पाटील यांनी योगदान दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id