SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन स्थापना दिननिमित्त ५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

schedule14 Apr 26 person by visibility 274 categoryसामाजिक

कोल्हापूर : जनरल प्रॅक्टिशनर्स  असोसिएशनचा स्थापना दिन तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार व समानता आणि न्यायाचे महान प्रवर्तक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती याचे औचित्य साधत रक्तदान शिबिर के. एम. ई हॉल बेलबाग  येथे  आयोजित केले होते.१४ एप्रिल २०२६ रोजी जनरल  प्रॅक्टिशनर्स असोसिएशन २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.या  दिवशीचे औचित्य साधून आज रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जवळपास ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले,यामध्ये ३७  डाक्टर्संनी रक्तदान करून समाजात एक आदर्श निर्माण केला.त्यामधे महिला डाॅक्टर्स यांनीही रक्तदान केले.

  या कार्यक्रम प्रसंगी जीपीए असोसिएशन कोल्हापूर अध्यक्ष डाॅ. शिवराज जीतकर, जीपीए सेक्रेटरी डाॅ.शशिकांत पाटील,जीपीए  खजानिस डॉ.अनिल कवठेकर,के.एम.ए अध्यक्ष डॉ.ए.बी.पाटील,के.एम.ए सेक्रेटरी डाॅ.अर्जुन अडनाईक,निहा अध्यक्ष डाॅ.सचिन भादवणकर,निहा सेक्रेटरी डाॅ.तुषार पांडव, निमा कोल्हापूर अध्यक्ष डाॅ.मुकुंद मोकाशी, निमा कोल्हापूर सेक्रेटरी डाॅ.राजेश सोनवणे,के.डी.जी.पी.ए अध्यक्ष डाॅ.अशोक रणदिवे, डॉ.सरदार पाटील,तसेच सर्व जीपीए चे पदाधिकाऱी डॉ.वर्षा पाटील, डाॅ.हरिष नांगरे,डाॅ.दिपक पोवार, डाॅ.गुणाजी नलवडे,डाॅ.विनायक शिंदे,डाॅ.महादेव जोगदंडे,डाॅ.पुजा पाटील, डॉ.सचिन आजगेकर, डाॅ.किशोर निंबाळकर, डाॅ.सचिन मुतालिक, डाॅ.अरुण धुमाळे,डाॅ.राजेश सातपुते,डाॅ.शितल पाटील व जीपीए लाईफ मेंबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        रक्तदात्यांना सर्टिफिकेट्स व गिफ्ट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व धन्वंतरी पुजन डाॅ.मोहन गुणे व डाॅ.राजेंद्र चिंचणीकर (अर्पण ब्लड बॅंक) यांच्या हस्ते करण्यात आले.के.एम. ए.अध्यक्ष डॉ.ए.बी.पाटील यांनी जीपीए च्या या उपक्रमाचे कौतुक केले.तसेच के.एम.ए नेहमीच जीपीए असोसिएशन बरोबर काम करत 
राहील असे सांगितले.डाॅ.शिवराज जीतकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांनी रक्तदान करण्याचे अवाहन केले. के.एम.ए असोसिएशन व अर्पण ब्लड बॅंकेचे आभार मानले.सूत्रसंचालन सचिव डॉ.शशिकांत पाटील यांनी केले,तर आभार खजानिस डॉ.अनिल कवठेकर यांनी मानले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id