SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

राजाराम तलावाजवळील थरारक जबरी चोरी २४ तासांच्या आत उघड! ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

schedule30 Sep 26 person by visibility 479 categoryगुन्हे

कोल्हापूर : राजाराम तलाव परिसरात तरुणाला मारहाण करून गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पसार झालेल्या तीन सराईत चोरांना राजारामपुरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ३,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे!

फिर्यादी श्रेयश सुनील कोरे (वय २४) हे २८ सप्टेंबर २०२६ रोजी राजाराम तलावाकडून सरनोबतवाडीकडे जात असताना, तलावाजवळ दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांना अडवले. जबर मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून हे लोभी पसार झाले होते. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे वेगाने सूत्रे हालवली. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या:

१. साद फारुख बेपारी (वय १९, रा. ९ वस्ती, मुडशिंगी, कोल्हापूर)
२. प्रफुल्ल सर्जेराव गजबर (वय १९, रा. सरनोबतवाडी, करवीर)
३. रोहन रुपेश पाटील (वय २२, रा. शिवशक्ती स्पोर्ट्स, उचगाव, करवीर)

आरोपींकडून जबरी चोरी केलेल्या १,५०,००० रुपये किमतीच्या सोन्याची चेनचे तुकडे आणि गुन्ह्यात वापरलेली दोन मोटारसायकल असा एकूण ३,००,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश इंगळे अधिक तपास करत असून, इतर पसार साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id