SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा; ३४ जणांना अटक, पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

schedule06 Apr 26 person by visibility 226 categoryगुन्हे

इचलकरंजी: कोल्हापूर जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर पोलीस अधीक्षक  योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. इचलकरंजी येथील तानाजी विष्णू आवळे याच्या घरात सुरू असलेल्या 'अंदर-बाहर' नावाच्या पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ३४ जणांना ताब्यात घेतले असून, एकूण ५,९१,६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, आवळे गल्ली, इचलकरंजी येथे तानाजी आवळे हा आपल्या राहत्या घरात लोकांना जमवून मोठ्या प्रमाणावर जुगार चालवत आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, ६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २:०० वाजता पोलिसांनी या बंदिस्त खोलीवर छापा टाकला. यावेळी ३४ इसम पत्त्याच्या पानावर पैसे लावून जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून २,९८,६१० रुपयांची रोख रक्कम आणि २८ मोबाईल हँडसेटसह जुगाराचे साहित्य असा एकूण ५,९१,६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर, मिरज आणि सांगली परिसरातील आहेत.

या प्रकरणी तानाजी आवळे याच्यासह इतर ३३ जणांविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  असून यामध्ये ऋषिकेश यादव, युवराज मोडीकर, विक्रम कुलकर्णी, संदीप कोंडेकर, फिरोज शेख, प्रीतम पाटील, उमेश खाडे, विशाल खोत, राहुल पाटील, संग्राम पाटील, आरिफ शेख, नितीन शिंदे, शफिक मुतवली, मुबारक शिरोळे, तौफिक पटवेगार, बापू सलगरे, संकेत आवळे, अक्षय पाटील, महंमद नदाफ, विजय आळंदे, रमेश डोईफोडे, मस्तान तहसिलदार, सर्फराज चाऊस, भरत सुर्यवंशी, राजू हेदुग्रे, पार्थ काकडे, मेहबूब कुडचीकर, राजाराम वडर, उमेश मोटे, स्वप्निल कुंभार, जॉय घाटगे, अहमद इनामदार आणि योहान लोखंडे. यांचा समावेश आहे.

 आरोपींना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी इचलकरंजी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id