SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

लोकसेवेचा नवा संकल्प: उपमहापौर अक्षय जरग यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

schedule19 Mar 26 person by visibility 310 categoryराजकीय

कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते  अक्षय विक्रम जरग यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी पेठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी खुले करण्यात आले.

या उद्घाटन समारंभावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, युवा नेते पृथ्वीराज धनंजय महाडीक, माजी उपमहापौर विक्रम जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले की, "शिवाजी पेठेतील जनतेशी अक्षय जरग यांचे कौटुंबिक नाते आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागतील." तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी, उपमहापौर जरग यांच्या कामाच्या पद्धतीचे कौतुक करत या कार्यालयामुळे विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे, 
नगरसेवक अजय  इंगवले, प्रसाद  चव्हाण यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवाजी पेठेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नववर्षाच्या सुरुवातीलाच लोकसेवेचे हे केंद्र सुरू झाल्याने पेठेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id