SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

टीकेआयईटीमध्ये 'वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब'चे दिमाखदार उद्घाटन

schedule22 Oct 26 person by visibility 599 categoryशैक्षणिक

वारणानगर : जागतिक सायबर सुरक्षा जनजागृती अभियानानिमित्त श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस) येथे सायबर सिक्युरिटी स्टुडंट्स असोसिएशन (CYSA) आणि एनसीसीच्या संयुक्त विद्यमाने सायबर जनजागृती कार्यक्रम व ‘वारणा सायबर सुरक्षा कवच क्लब’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सायबर कॉलेज, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून डिजिटल व्यवहार, पासवर्ड सुरक्षितता आणि सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत जनजागृती केली.
 
वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष,डॉ.विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन. एच. पाटील आणि वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे मार्गदर्शन लाभले.
 
कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल प्रमुख पाहुणे, तर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हरुगडे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. शाहूवाडी उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, पोलीस उपअधीक्षक संजय डौर आणि प्रोबेशनरी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत थिकाणे विशेष अतिथी होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी होते. प्रभारी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील आणि डीन डॉ. एस. एम. पिसे, प्रा. बी. आर. बागणे उपस्थित होते.
 
नीलोत्पल यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी निष्ठा, समर्पण आणि दृढनिश्चय या त्रि-सूत्राचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. संजय हरुगडे यांनी सायबर फसवणुकीचे प्रकार व प्रतिबंधात्मक उपाय स्पष्ट केले. कोल्हापूर पोलीस सायबर सुरक्षा जनजागृती व्हॅनद्वारे सायबर गुन्हेगारी व डेटा सुरक्षेची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
 
डॉ. एस. एम. पिसे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुभाष कोळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रगती व स्वप्ना यांनी आभार मानले. आयोजनासाठी प्रा. राजेश गाडे, प्रा. लेफ्टनंट आर. बी. नाईक आणि प्रा. लोचन आदूलकर यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id