SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे राज्यपालांना निमंत्रण

schedule23 Oct 26 person by visibility 206 categoryराज्य

◼️कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट
 
 मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना लोक भवन येथे दिले.

 यावेळी मंत्री  गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तयारीची तसेच या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व असलेल्या सोहळ्याच्या नियोजनाची माहिती राज्यपालांना दिली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरेची महत्वपूर्ण केंद्रे असून, सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्राच्या आध्यात्मिक वैभवाचे दर्शन घडविणारा महत्वाचा उत्सव आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून देशभरातील संत-महंत, साधू आणि भाविकांच्या श्रद्धेला एकत्रित व्यासपीठ मिळणार आहे.

 सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन भव्य, दिव्य, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, आवश्यक पायाभूत सुविधा, भाविकांची सोय आणि विविध प्रशासकीय व्यवस्थांच्या नियोजनावर भर देण्यात येत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी दिली.

  यापूर्वी देखील २०१५ मध्ये झालेल्या कुंभमेळा मंत्री म्हणून कुंभ सुरक्षित कशा पद्धतीने पार पाडला व यशस्वी नियोजन करण्यात आले होते याबद्दल देखील माहिती राज्यपालांना  मंत्री गिरीश महाजन यांनी  दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id