SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

पर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे: उद्योजिका मोनिका मोहिते यांचे प्रतिपादन; किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ उद्घाटन

schedule28 Oct 26 person by visibility 230 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : "माणसाचे जगणं सुसह्य होण्यासाठी शेती उत्पादने अत्यंत महत्त्वाची असून, सध्याच्या काळात पर्यावरणीय समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे," असे प्रतिपादन कोल्हापूरच्या प्रसिद्ध उद्योजिका मोनिका मोहिते यांनी केले. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि.च्या सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत आयोजित ‘किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

▪️सेंद्रिय शेती आणि आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण विचार
आपल्या सेंद्रिय शेती उत्पादनाचे दाखले देत मोनिका मोहिते पुढे म्हणाल्या की, येणाऱ्या काळात सेंद्रिय उत्पादनाशिवाय आरोग्य राखणे अशक्य आहे. सेंद्रिय उत्पादने महाग असतात, असा एक मोठा गैरसमज समाजात आहे. प्रत्यक्षात या उत्पादनांसाठी घ्यावी लागणारी अतिरिक्त मेहनत आणि कष्ट पाहता, त्यामागील किंमत अगदी रास्त असते. माणूस औषध-गोळ्यांवर आणि इतर गोष्टींवर विनाकारण खर्च करतो, परंतु आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर मात्र काटकसर केली जाते. दुर्दैवाने आजही शेती आणि शेतकरी या दोन्ही घटकांना समाजात हवी तशी प्रतिष्ठा मिळत नसल्यामुळे उदासीनता दिसून येते. अशा पर्यावरणीय चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

▪️महोत्सवाचा शुभारंभ व मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाची सुरुवात रोपाला पाणी घालून करण्यात आली. प्रास्ताविकात सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी चित्रपट महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करताना, अशा महोत्सवांतून जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
सायबरचे संचालक डॉ. आर.के. टेलर यांनी महाविद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर किर्लोस्कर कंपनीचे साईड लीडर सुरेश मगदूम यांनी कंपनी शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. मानव संसाधन अधिकारी हरीश सायवे यांनी, तरुणांनी पर्यावरण जागृतीबाबत दक्ष असणे गरजेचे असून त्यांच्या कृतिशील उपक्रमाशिवाय पर्यावरण संवर्धन शक्य नसल्याचे नमूद केले.


▪️विविध स्पर्धा व उपक्रम
या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, शाश्वत विकास मंचाच्या डॉ. पूजा पाटील, लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम माने व प्रा. महेंद्र जनवाडे यांनी केले, तर आभार समन्वयक प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी मानले.

दिवसभर चाललेल्या या महोत्सवात सुमारे १२ पर्यावरणीय माहितीपट दाखवण्यात आले. तसेच पर्यावरणावर आधारित रील मेकिंग, फोटो कॉम्पिटिशन, स्लोगन, फेस पेंटिंग, कविता आणि पर्यावरणीय नाविन्य उपक्रम सादरीकरण स्पर्धा पार पडल्या; ज्यामध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

महोत्सवाच्या सत्रात डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या डॉ. शिंपा शर्मा, चिदंबर शिंदे, तेजस झगडे, सागर चौगुले आदींची व्याख्याने व कार्यशाळा पार पडली. समारोपीय सत्रात सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात पर्यावरणासाठी उल्लेखनीय काम करणारे रोहित व रक्षिता बनसोडे या बहिण-भावंडांचा त्यांच्या पर्यावरणीय योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहन तायडे, अन्वर फकीर, रितेश कांबळे, प्रा. अनघा खत्री, प्रा. ऋतुजा माळी आदींचे विशेष सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id