SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

क्षयरोग दुरीकरण मोहिमेत राज्यस्तरावर कोल्हापूरचा गौरव

schedule23 Feb 26 person by visibility 302 categoryआरोग्य

▪️राज्यस्तरीय सोहळ्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचा गौरव

 कोल्हापूर : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळ स्तरीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य  कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यात  राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर व  सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे कोल्हापूर जिल्ह्याने हे यश प्राप्त केले आहे.

  या यशामध्ये सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी, सर्व जिल्हा क्षयरोग केंद्र व एन.टी.इ.पी.अधिकारी/कर्मचारी, सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका ,“निक्षय मित्र" (डोनर),  खासगी संस्था, एन.एम.पी.,एन. जी.ओ.यांचा सहभाग आहे.
 
  राज्यामध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्था, अधिकारी व कर्मचारी यांचा दरवर्षी शासनामार्फत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात येतो. यावर्षी हा सोहळा 22 फेब्रुवारी रोजी यशंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट मुंबई येथे पार पडला.

  या कार्यक्रमाला मुंबईचे नूतन उपमहापौर संजय घाडी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, डॉ. विजय कंदेवाड तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id