SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची दिल्ली विद्यापीठाला भेट, महाविद्यालयीन निवडणुकीची कार्यपद्धती घेतली जाणून

schedule14 Mar 26 person by visibility 320 categoryराजकीय

कोल्हापूर  :  नवी दिल्लीतील महाविद्यालयीन निवडणुका अत्यंत चुरशीने होतात. बहुतांश विद्यापीठातील विद्यार्थी संघटना अत्यंत सक्रिय आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नुकतीच दिल्ली विद्यापीठाला भेट दिली. तिथल्या निवडणुकांची पद्धत आणि युवक संघटनांच्या कामकाजाविषयी त्यांनी माहिती घेतली. त्यातून महाविद्यालयीन पातळीवर नेतृत्व करणार्‍या आर्यमान यांच्याशी कृष्णराज महाडिक यांनी संवाद साधला.

 महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिल्ली विद्यापीठाला नुकतीच भेट दिली.

 विद्यापीठाच्या प्रांगणात असलेल्या श्री स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला अभिवादन करून विद्यापीठातील विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. विशेषतः विद्यापीठ युनियनचे लीडर आर्यमान यांची कृष्णराज यांनी भेट घेतली.

 नवी दिल्लीतील महाविद्यालयीन निवडणुकांची कार्यपध्दती, विद्यार्थी संघटनांना असलेले अधिकार आणि त्यांची उद्दीष्ट, महाविद्यालयातील शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण याबद्दल कृष्णराज महाडिक यांनी माहिती घेतली. त्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. देशभरातून युवापिढीचे प्रश्न आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी ही भेट महत्वाची ठरल्याचे कृष्णराज महाडिक म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id