SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नव्या शाखेचे कोल्हापुरात थाटात उद्घाटन

schedule30 Oct 26 person by visibility 308 categoryउद्योग

◼️ बँकेचे अध्यक्ष सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते फीत कापून शुभारंभ; कोल्हापूरकरांना तत्पर व विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प

कोल्हापूर : सामान्य नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावणे आणि विविध घटकांना भक्कम पाठबळ देणे या उद्देशाने कार्यरत असलेल्या सोलापूरच्या प्रसिद्ध 'लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लि.'च्या नव्या शाखेचे कोल्हापुरात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. डी.वाय. पाटील मॉलसमोरील 'एलिक्सा पार्क'मध्ये बँकेची ८ वी शाखा सुरू झाली असून संस्थेचे अध्यक्ष सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. पत्रकार परिषदेत बँकेच्या संचालकांनी व व्यवस्थापनाने बँकेच्या प्रगतीचा आलेख आणि कोल्हापूरकरांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

गेल्या २८ वर्षांपासून सहकार क्षेत्रात यशस्वी घौडदौड करणाऱ्या लोकमंगल बँकेने ग्राहकांच्या विश्वासावर भक्कम पकड निर्माण केली आहे. बँकेचे वसूल भागभांडवल २८.४१ कोटी रुपयांहून अधिक असून, ठेवी ४६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत. विशेष म्हणजे, बँकेचे एनपीए (थकीत कर्ज) प्रमाण केवळ ०.७९ टक्के असून बँक अत्यंत सुरक्षित व नफा कमावणारी संस्था म्हणून नावारूपास आली आहे.


कोल्हापूर शाखेच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक, महिला आणि तरुणांसाठी विविध कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा बसवेश्वर महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांसारख्या शासकीय योजनांतर्गत अत्यल्प व्याजदरात हजारो लोकांना अर्थसहाय्य दिले जात आहे.

 तसेच महिला सक्षमीकरणासाठी 'आई' महिला केंद्रित पर्यटन व्याज परतावा योजना आणि ३५ टक्के सबसिडीसह अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग योजनाही उपलब्ध आहे.

कोल्हापूर शाखेत ग्राहकांसाठी ३६५ दिवस अखंड सेवा, आयएमपीएस (IMPS), आरटीजीएस/नेफ्ट (RTGS/NEFT), मोबाईल बँकिंग, कोणत्याही एटीएममधून मोफत पैसे काढण्याची सुविधा आणि लॉकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अल्प व्याजदरात सोने तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज आणि वाहनकर्ज त्वरित उपलब्ध करून दिले जाणार आहे. या सर्व योजनांचा व अत्याधुनिक सेवांचा कोल्हापूरकरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id