SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

राजापूर–राजापूरवाडी रस्त्यासाठी आमदार यड्रावकर यांचा ५० लाखांचा निधी मंजूर

schedule24 Oct 26 person by visibility 279 categoryराज्य

◼️विद्यार्थिनीच्या भावनिक पत्राची दखल; रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार

जयसिंगपूर : गट-तट, पक्षीय राजकारण आणि लहान-मोठे भेद बाजूला ठेवून एका विद्यार्थिनीच्या भावनिक पत्राची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दखल घेतली असून तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. राजापूर–राजापूरवाडी रस्त्याच्या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी आमदार यड्रावकर यांनी यापूर्वीच मंजूर केला आहे. मात्र, शिक्षक-पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने या कामाचा शुभारंभ करता आला नाही. या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होऊन तातडीने रस्ता पूर्ण होणार आहे.

 आमदार यड्रावकर यांच्या या पुढाकारामुळे रस्त्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला बळ मिळाले असून, शाळेत जाण्यासाठी खड्ड्यांशी झुंज देणाऱ्या विद्यार्थिनीच्या स्वप्नांना आता सुरक्षित वाट मिळणार आहे.

‘आमदार काका, रस्ता करून द्या हो! मला खूप शिकायचे आहे. मोठी होऊन कलेक्टर बनायचे आहे,’ अशा भावनिक शब्दांत राजापूर येथील एका विद्यार्थिनीने पत्राद्वारे आमदार यड्रावकर यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या होत्या. शिक्षणाची जिद्द उराशी बाळगून शाळेत जाणाऱ्या या चिमुकलीला खराब रस्त्यामुळे दररोज त्रास सहन करावा लागत होता. तिच्या पत्रातून व्यक्त झालेली व्यथा लक्षात घेत आमदार यड्रावकर यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

राजापूर गावापासून राजापूरवाडी येथील शाळेपर्यंतचे अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे. यातील काही भाग चांगला असला, तरी उर्वरित रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायकलवरून प्रवास करताना कसरत करावी लागते. पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांत साचलेल्या पाण्यामुळे हा प्रवास अधिक त्रासदायक बनतो. या समस्येची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रस्त्याच्या कामासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार यड्रावकर यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले आहे. 

एका चिमुकलीने पत्रातून मांडलेल्या समस्येची दखल घेत कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थिनीला शाळेत जाण्यासाठी खड्ड्यांशी संघर्ष करावा लागू नये, तसेच तिच्या शिक्षणाच्या प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत, हीच या प्रयत्नामागील भावना आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकारातून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर चिमुकलीच्या स्वप्नांना बळ मिळणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id