SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील

schedule17 Mar 26 person by visibility 412 categoryराजकीय

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी अत्यंत चुरशीच्या पण उत्साही वातावरणात पार पडली. यामध्ये महायुतीचे वर्चस्व सिद्ध झाले असून, अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या शिल्पा शशिकांत खोत (सेनापती कापशी, ता. कागल) तर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे तानाजी कृष्णात पाटील (गडमुडशिंगी, ता. करवीर) यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केवळ अर्ध्या तासाच्या प्रशासकीय प्रक्रियेनंतर या निवडीची अधिकृत घोषणा केली.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० सदस्य असल्याने अध्यक्षपद आपल्याच पक्षाकडे खेचून आणण्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने राजकीय वर्तुळात मुश्रीफ यांच्या कौशल्याची चर्चा होत आहे. ६८ सदस्यीय सभागृहात महायुतीचे ५१ सदस्य असल्याने त्यांचे पारडे जड होते. 

महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या रसिका पाटील आणि संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते; मात्र गटनेते सुधीर देसाई आणि संग्राम कुपेकर यांच्या विनंतीनंतर त्यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

निवडीची घोषणा होताच जिल्हा परिषद परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी फटाक्यांची मोठी आतिषबाजी केली आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. कागल आणि करवीर तालुक्याला या निवडीमुळे जिल्हा परिषदेचे महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id