SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

'राष्ट्रवादी'मध्ये कोणताही संघर्ष नाही; महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर आमचाच दावा : मंत्री हसन मुश्रीफ

schedule02 Apr 26 person by visibility 255 categoryराजकीय

कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या चर्चा आणि पक्षांतर्गत वादावर आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले. रूपाली चाकणकर यांच्यानंतर या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच (अजित पवार गट) दावा कायम असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध असून पक्षामध्ये कोणतेही छोटे-मोठे मतभेद असल्यास ते चर्चेतून सोडवले जातील. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सक्षमपणे वाटचाल करत असून, आगामी काळात संघटनात्मक बांधणीवर अधिक भर दिला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी स्थानिक राजकारणावरही भाष्य केले. विशेषतः 'गोकुळ' दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन पुढे जाण्याची भूमिका त्यांनी मांडली. तसेच निवडणूक बिनविरोध बाबत बोलताना अजून मतदार यादीत फायनल झाल्यामुळे आताच याविषयी जास्त बोलणे संयुक्तिक ठरणार नाही असे त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी समन्वय असून पक्षहितासाठी सर्वजण एकत्र काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

या पत्रकार परिषदेमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id