SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त विक्रमी २१ लाख ७० हजार लिटर दूध विक्री!

schedule27 Oct 26 person by visibility 252 categoryउद्योग

◼️गुणवत्ता आणि ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर गोकुळची झेप;

 गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ४१ हजार ९५२ लिटरची वाढ

 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तब्बल २१ लाख ७० हजार ४७८ लिटर दूध विक्री झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ४१ हजार ९५२ लिटर म्हणजेच सुमारे ७ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

 

गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गोकुळची दूध विक्री २० लाख २८ हजार ५२६ लिटर होती. यंदा दूध विक्रीत झालेली लक्षणीय वाढ ही गोकुळच्या गुणवत्तेवर ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती आहे. दूध उत्पादकांचे सहकार्य, ग्राहकांची पसंती, प्रभावी मार्केटिंग नियोजन आणि सक्षम वितरण व्यवस्था यामुळे गोकुळच्या दूध विक्रीचा आलेख सातत्याने उंचावत आहे.

गोकुळ दूध संघाने दूध संकलनाबरोबरच दूध विक्री आणि दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर विशेष भर दिला आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा आदी दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. ग्राहकांना दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी संघाच्या मार्केटिंग व वितरण विभागामार्फत आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. 

या यशामध्ये दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी आणि वाहतूक ठेकेदार यांचे मोलाचे योगदान असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त झालेल्या या विक्रमी दूध विक्रीसाठी संघाच्या मार्केटिंग विभागाने प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली.

 याबद्दल डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील यांच्यासह मार्केटिंग विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी अभिनंदन केले.

तसेच या यशाबद्दल सर्व दूध उत्पादक, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतकांचे आभार मानून गोकुळ परिवाराच्या वतीने सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id