SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
धक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता

जाहिरात

 

सीपीआर मध्ये यशस्वी व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया; रुग्णसेवेत महत्त्वपूर्ण पाऊल

schedule11 Apr 26 person by visibility 300 categoryआरोग्य

कोल्हापूर :  छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) हॉस्पिटलमध्ये व्हेरिकोज वेन्स (पायांच्या शिरांच्या आजारावर) यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णसेवेत आणखीन एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. उदय मनोहर कांबळे या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

यापूर्वी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. मात्र आता सीपीआरमध्ये आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याने शासकीय स्तरावरच शस्त्रक्रिया करणे सुलभ झाले आहे . त्यामुळे रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

डॉ. शुभम हिरेमठ यांनी या रुग्णावर वैयक्तिक लक्ष देत उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली.या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी सर्जन डॉ. संजय देसाई, डॉ.स्वेनील शाह ,भूलतज्ज्ञ डॉ. तेजश्री महिंद आणि सर्जरी विभागातील डॉ. प्रणव यांचे मोलाचे योगदान लाभले. 

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे भाविष्यात व्हेरिकोज वेन्सच्या रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळणार आहेत .यामध्ये अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. लवकरच अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होणार असल्याने रुग्णसेवा अधिक सक्षम व व्यापक होईल.

सीपीआर हॉस्पिटलमध्ये आता व्हेरिकोज वेन्स शस्त्रक्रिया नियमितपणे उपलब्ध झाली असून, गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id