SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजनधक्कादायक! सुरक्षिततेचे नियम धाब्यावर; आजऱ्यात भिंत कोसळून दोन निष्पाप जीव गेले!जागतिक संयुक्त राष्ट्र चिनी भाषा दिवस: संस्कृती आणि वारशाचा संगमकागलमधील बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, शिवम आणि ओजस विजेतेमहात्मा बसवेश्वर यांची जयंती मंत्रालयात साजरीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून महावितरणची 15.40 कोटींची कामे पुर्णशिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ केंद्राच्या कामगिरीचा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून गौरवअक्षय्य तृतीया: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ आणि मंगल सणडेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमित्राच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा; कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

जाहिरात

 

सीपीआर रुग्णालयातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर

schedule12 Mar 26 person by visibility 294 categoryआरोग्य

कोल्हापूर  : छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेजची कामे, सर्व इमारतींचे अंतर्बाह्य सुशोभीकरण तसेच अनुषंगिक दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहेत. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागातील काही विभागांचे तात्पुरते स्थलांतर करून तेथील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

बाह्यरुग्ण विभागातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग (खोली क्र. २०३) हा विभाग त्वचा व गुप्त रोगशास्त्र विभागात (खोली क्र. ३०६) १३ मार्चपासून स्थलांतरित करण्यात येणार असून तेथूनच रुग्णसेवा सुरळीतपणे सुरू ठेवली जाणार आहे. तसेच त्वचा व गुप्त रोगशास्त्र विभागाचा बाह्यरुग्ण विभाग हा विभागप्रमुखांच्या कक्षात व शेजारच्या खोलीत सुरू ठेवण्यात येईल.

सर्व रुग्णांनी तसेच संदर्भित करणाऱ्या रुग्णालयांच्या प्रमुखांनी या बदलाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून रुग्णांची गैरसोय टाळता येईल व भविष्यात अधिक चांगल्या पद्धतीने रुग्णसेवा देता येईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id