SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

चैनीसाठी घरचाच घात! वडिलांच्याच घरातून लांबवले १० लाखांचे दागिने; करवीर पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश, चक्क 'मुलगाच' निघाला चोर

schedule29 Sep 26 person by visibility 527 categoryगुन्हे

कोल्हापूर  : करवीर तालुक्यातील शांकभरी कॉलनी, शिंगणापूर येथे सुनील बंडगर यांच्या घरी झालेल्या १० लाख ३२ हजार रुपयांच्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणला असून, खुद्द फिर्यादीच्या मुलानेच चैनीसाठी हा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.

   दिनांक २८/९/२०२६ रोजी करवीर तालुक्यातील शांकभरी कॉलनी शिंगणापूर येथील राहणारे सुनील बंडगर यांच्या घरी घरफोडी होऊन त्यामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी फिर्यादी सुनील सुखदेव बंडगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

   कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्या, दरोडे व जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पथके तयार केली होती.

   तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अंमलदार शुभम संकपाळ व युवराज पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, शांकभरी कॉलनी येथील झालेली घरफोडी चोरी ही फिर्यादी यांचा मुलगा यश बंडगर यानेच केली असून, तो हा मुद्देमाल लक्षतीर्थ वसाहत येथे विक्रीसाठी घेऊन जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहत ते शिंगणापूर जाणारे रोडवर सापळा रचून यश बंडगर यास ताब्यात घेतले.

   आरोपीकडे चौकशी केली असता त्याच्याकडून १०,३२,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली, जी कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आली. तसेच त्याने चैनीसाठी स्वतःच्याच घरी चोरी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील मुद्देमाल करवीर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

   सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक  अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या इतर अंमलदारांनी केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id