SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

'गोकुळ' : बापाच्या घामाचं मोल अन् मुलाच्या चेअरमनपदासाठी चुये गावाकऱ्यांचं स्मारकाला साकडं!

schedule29 Oct 26 person by visibility 319 categoryसामाजिक

कोल्हापूर : ज्यांच्यामुळे गोकुळ घराघरांत पोहोचला, ज्याच्या घामावर आज दूध संघाचा डोलारा उभा आहे त्या बापाच्या कष्टाची आणि निष्ठेची परतफेड आज त्याच्या मुलाला चेअरमन करून करा अशी भावनिक साद घालत चुये ग्रामस्थांनी बुधवारी  स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्मारकासमोर अश्रू आणि श्रद्धेने नतमस्तक होत साकडे घातले. गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली, सत्तेची गणितं बदलली.

 आमदार सतेज पाटील यांनी निवडणुकीपूर्वी शशिकांत पाटील चुयेकर यांना चेअरमन करण्याचा शब्द दिला होता.  गोकुळच्या निवडणुकीत २५ पैकी १३ जागा जिंकून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने बाजी मारली. त्यामुळे गोकुळला उजिर्तावस्था मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्लया  त्यांच्या रक्ताचा वारसदार शशिकांत पाटील-चुयेकर यांना न्याय मिळावा, अशी भावना चुये ग्रामस्थांनी व्यक्त केली. पन्हाळा तालुक्यातील पुशिरे येथील सचिन सर्जेराव पाटील या कार्यकर्त्याने कुशिरे ते थेट श्री अंबाबाई मंदिरापर्यंत तब्बल २५ किलोमीटरचा  दंडवत घातला. तर दुसरीकडे, गोकुळ शिरगाव येथील स्व. चुयेकरांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या दूध उत्पादकांनी पुष्पहार अर्पण करताना अभिवादन केले. 

🟢 "पक्षीय राजकारण आणि खुर्च्यांची ताटातूट शेतकऱ्यांनी खूप पाहिली. पण ज्या माणसाने गोकुळसाठी आपलं उभं आयुष्य खर्ची घातलं, त्या आनंदराव चुयेकरांच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आता आली आहे. त्यांच्या मुलाला संधी मिळायलाच हवी."
— विश्वास कोंडिबा शिंदे (कणेरी)


🟣"स्व. आनंदराव पाटलांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर शशिकांत पाटलांना चेअरमन करा. सर्व २५ संचालकांनी पक्षभेद बाजूला ठेवून एका सच्चा कार्यकर्त्याच्या पुत्राच्या पाठीशी उभं राहावं."
— सर्जेराव आनंदराव पाटील (गडमुडशिंगी)


🟡"तळागाळातील सामान्य दूध उत्पादकासाठी आनंदराव चुयेकरांनी घेतलेले कष्ट आम्ही डोळ्यांनी पाहिलेत. त्या कष्टाची पावती आज त्यांच्या मुलाला मिळायला हवी.
— वसंत ज्ञानू राऊत

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id