SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
स्पर्धात्मक युगातील विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी ‘मानससूत्र’ उपक्रम; अध्यापकांना विशेष प्रशिक्षणशिक्षण महर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन अत्यंत दुःखद! ​खासदार धनंजय महाडिक यांची भावपूर्ण श्रद्धांजलीकोल्हापुरात 'राज्यपाल क्रीडा महोत्सव' व्हावा!देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ द्या : आमदार यड्रावकर; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन दिले निवेदनउच्च गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उत्साहात प्रवेशमहापौरांचा 'जनता दरबार' ५ ऐवजी ११ ऑगस्ट रोजीशहरातील ड्रेनेजची कामे विहीत वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडश्रद्धांजली​"कर्मभूमीतील विद्यापीठाकडून झालेला सन्मान महत्त्वाचा," पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली होती कृतज्ञतासमाजकारण-राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला

जाहिरात

 

'आम्ही एकत्र लढणार!': राहुल गांधी आणि विरोधकांची गांधी स्मृतीस्थळावर NEET च्या मृतांना आदरांजली

schedule23 Jul 26 person by visibility 342 categoryदेश

नवी दिल्ली: NEET पेपर लीक प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त होत असताना, आज गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत लोकसभेतील आणि राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी हजेरी लावत पुढील रणनीतीवर चर्चा केली.

या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुले, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, प्रमोद तिवारी, इम्रान प्रतापगढी तसेच राजदचे खासदार संजय यादव आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेत स्पष्ट केले की, जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत संसद चालू दिली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांना मंत्रिपदावरून हटवावेच लागेल, असे ते म्हणाले.

बैठकीनंतर राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी  'Gandhi Smriti' (गांधी स्मृती) स्थळाकडे शांततापूर्ण मार्च काढला. NEET पेपर लीक प्रकरणानंतर नैराश्यातून किंवा इतर कारणांमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतींना यावेळी उजाळा देण्यात आला.

"◼️आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत, ज्यांना न्याय आणि उत्तरदायित्वाची शांततापूर्ण मागणी केल्याबद्दल मारहाण झाली. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत, संपूर्ण विरोधक त्यांच्या न्याय्य मागणीसाठी सोबत आहेत."
 — राहुल गांधी (खासदार, काँग्रेस)

यावेळी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एकजुटीचा नारा दिला आणि NEET प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी लावून धरली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id