SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन

schedule22 Oct 26 person by visibility 300 categoryआरोग्य

कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी केएमए कॉन २०२६ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे. या परिषदेची व्याप्ती मोठी असून या ही परिषद कोल्हापुरात दिनांक २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.


अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ए .बी पाटील,परिषदेच्या अध्यक्षा डॉ. गौरी  साईप्रसाद, परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. संदीप पाटील आणि सचिव डॉ.अर्जुन अडनाईक, खजानीस डॉ. प्रवीण नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

   अवघा रंग एक (One Community , One Vision) या ब्रीदवाक्यावर आधारित या परिषदेकरता मुंबईतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अनंत जोशी हे ' स्पोर्ट्स मेडिसीन आणि इजा वीरहित व्यायाम' या विषयावर आणि मुंबई येथील योग तज्ञ रूपा चक्रवर्ती " योग " विषयावर लोक जनजागृती पर व्याख्यान देणार आहे. सदर कार्यक्रम रविवारी सायंकाळी पाच वाजता हॉटेल सयाजी येथे होणार आहे.

परिषदेचे उद्घाटन शनिवारी दिनांक २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता होणार असून अतिरिक्त पोलीस महासंचालक बेंगळुरू येथील हेमंत निंबाळकर आणि सोलापूरचे नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.परिषदेमध्ये ए आय वर्कशॉप आणि विविध व्याख्यानांमार्फत तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. मुंबईतील नामांकित डॉ. रॉय पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. केएमएच्या वतीने दिला जाणारा डॉ.अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पोटविकार तज्ञ डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम रविवारी दुपारी बारा वाजता होणार आहे.दरम्यान परिषदेत  गर्भावस्थेपासून बालपणापर्यंत कोणती काळजी घ्यावी,संधिवात, मधुमेहामधील आहार, यकृताचे आजार , राष्ट्रीय अतिदक्षता विभागाचा कोल्हापूरमध्ये विकास,स्तंभन दोष,चष्म्यातून मुक्ती, रक्तविकार, मेंदूविकार अशा अनेक विषयांवर चर्चा आणि तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
परिषदेस देशभरातून ६०० डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे.

पत्रकार परिषदेस खजनीस डॉ. प्रविण नाईक,डॉ. दिलीप पाटील,डॉ. आर.एस. पाटील,डॉ. विजय गावडे,डॉ. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id