SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्तकोल्हापुरात उत्साहात संपन्न झाली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद; राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११ येथे ज्ञानाचा महाकुंभ!

जाहिरात

 

कोल्हापूर: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण व जबरी चोरी करणारे ३ जण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

schedule09 Oct 26 person by visibility 464 categoryगुन्हे

कोल्हापूर : उजळाईवाडी येथे एका तरुणाचे अपहरण करून त्याला लोखंडी दांडक्याने व बेल्टने गंभीर दुखापत करत जबरी चोरी करणाऱ्या तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांतच बेड्या ठोकल्या आहेत. ही धडक कारवाई ९ ऑक्टोबर रोजी राजाराम तलाव परिसरात करण्यात आली.

​प्राप्त माहितीनुसार, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी समीर गुलाब शेख (वय ३३, रा. नवीन वाशी नाका, नाना पाटील नगर, कोल्हापूर) हे उजळाईवाडी येथील विमानतळ रोडवर असताना आरोपींनी त्यांना अडवले. "तू आमचे मोबाईल हॅक करत आहेस," असा संशय व राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला डोक्यात व पाठीवर लोखंडी दांडक्याने, चमड्याच्या बेल्टने तसेच डांबरी काटा व परफ्युम गॅस सिलिंडरने बेदम मारहाण केली. त्यानंतर तवंदी घाट व कर्नाटक भागात नेऊन फिर्यादीच्या खिशातील ३२,००० रुपये जबरीने काढून घेतले आणि मोबाईलद्वारे ऑनलाइन १३,६०० रुपये ट्रान्सफर करून घेतले. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक  नीलोत्पल आणि अपर पोलीस अधीक्षक  अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्वतंत्र पथक नेमून समांतर तपास सुरू केला होता. दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील व संतोष बरगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पथकाने राजाराम तलाव परिसरात सापळा रचून १) सलमान अस्लममुहम्मद शेख उर्फ पठाण (वय ३४, रा. गोवंडी, मुंबई), २) हर्षवर्धन गणेश खडगे (वय १९, रा. निप्पाणी, कर्नाटक) आणि ३) रजत सचिन जाधव (वय १९, रा. निप्पाणी, कर्नाटक) या तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्यांना पुढील तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
Task Information
JSON Output

    
JSON Output

    
themes Id